छोटा राजनच्या गुंडांची संजय दिना पाटलांना जीवे मारण्याची धमकी

February 5, 2015 11:39 PM0 commentsViews:

 sanjay patil05 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय दिना पाटील यांना छोटा राजनच्या गुंडांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बाब समोर आलीये. फोनवरून दिना पाटील यांना ही धमकी देण्यात आलीये. या प्रकरणी भांडुप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बुधवारी संध्याकाळी छोटा राजन गँगचे गुंड डेफ्री डिसुझा आणि निलेश पडाळकर या दोघांनी पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. माथाडी कामगारांच्या संघटनेत संजय दिना पाटीलयांचं वर्चस्व वाढत आहे. त्यामुळेच राजन याचं नाव घेऊन फोनवरूनही धमकी देण्यात आली. निलेश पडाळकर हा कुख्यात गुन्हेगार असून मोक्का कायद्याखाली तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. दहा दिवसांपूर्वीच त्याची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर त्याने संजय दिना पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्या नंबरवरून पाटील यांना फोन आला तो नंबर पोलिसांनी ट्रॅक केलाय. फोन कुणी केलाय त्याची ओळख पटली असून दोन्हीही गुंड फरार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close