श्रेया घोषाल लग्नाच्या बंधनात

February 6, 2015 10:05 AM0 commentsViews:

Shreya

06 फेब्रुवारी :  बॉलिवूडची प्रसिद्ध प्लेबेक सिंगर श्रेया घोषाल काल विवाहबंधनात अडकली आहे. सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या श्रेयाने, तिच्या बॉयफ्रेंड शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केल्याची माहिती श्रेयाने ट्विटर वरुन दिली आहे.

श्रेयाने काही दिवसांपूर्वीच ट्विटरवरुन लग्न करण्यार असल्याचे संकेत दिले होते, त्यानंतर आज अधिकृतपणे तिने विवाहाची माहिती दिली आहे. यावेळी तिच्या सोबत तिचे कुटुंबिय आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत होते.

श्रेयाने शिलादित्यशी बंगाली पद्धतीने लग्न केलं. शिलादित्यने गेल्या वर्षी श्रेयाला प्रपोज केलं होतं आणि श्रेयाने लगेच होकार कळवला होता. शिलादित्य श्रेयाच्या मधुर आवाजाच्या आणि गोड स्वभावाच्या प्रेमात होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close