विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 22 ऑक्टोबरलाच

September 11, 2009 9:39 AM0 commentsViews: 5

11 सप्टेंबर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ठरल्याप्रमाणे 22 ऑक्टोबरलाच होणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी नागपूरमध्ये जाहीर केलं. मतमोजणी दिवाळीपूर्वी घेण्याची चर्चा सुरू होती. मात्र याला राजकीय पक्षांनी विरोध केला होता. महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आलेल्या निवडणूक आयुक्तांनी विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सागिंतलं. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा बार दिवाळीनंतरच उडेलं.

close