तिसर्‍या दिवशीही पंकजा मुंडे आघाडीवर, मुख्यमंत्री दुसर्‍या तर शिंदे तिसर्‍या क्रमांकावर

February 6, 2015 2:20 PM2 commentsViews:

STAR_MANTRI06 फेब्रुवारी : तिसर्‍या दिवशी पंकजा मुंडे आघाडीवर, देवेंद्र फडणवीस दुसर्‍या, तर तिसर्‍या स्थानावर एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे.

राज्यातल्या भाजप सरकारला उद्या म्हणजे 7 तारखेला 100 दिवस पूर्ण होताहेत. हीच संधी संाधून आयबीएन लोकमतने महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपल्या मंत्र्यांना त्यांच्या कामगिरीनुसार रेटिंग देण्याचं आवाहन केलं आहे. आमच्या या आवाहनाला दर्शकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. या रेटिंग स्पर्धेचा आजचा तिसर्‍या दिवस आहे. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या क्रमाकांवर होते. पण दुसर्‍या दिवशी मात्र, पंकजा मुडे सर्वाधिक लोकप्रिय स्टार मंत्री ठरल्यात. तिसर्‍या दिवशीही पंकजा मुंडेंनी आघाडी कायम ठेवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर शिवसेनेचे नेते आणि एम.एस.आर.डी.सी मंत्री एकनाथ शिंदे तिसर्‍या क्रमांकावर आहेत. तर चौथ्या क्रमांकावर विनोद तावडे आहेत. शिवसेनेचे सुभाष देसाई पाचव्या क्रमांकावर आहेत.

आता या रेटिंग्जमध्ये बदलही होऊ शकतो. त्यासाठी तुम्हीही आपलं मत नोंदवलं नसेल तर तात्काळ आयबीेएन लोकमतच्या वेससाईटवर जाऊन टीेम देवेंद्र स्टार मंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या कामगिरीनुसार रेटिंग्ज द्या. त्यासाठी आमचा वेबसाईट  www.ibnlokmat.tv वर भेट करा. अधिक अपडेटसाठी वापरा हॅशटॅग #100DaysofTeamDevendra. आपल्या स्टार मंत्र्यांना रेटिंग देण्यासाठी तुमच्याकडे आज (शुक्रवारी) संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ आहे. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Shiv

    But I don’t understand why Pankaja munde is on first position even she has not done well.

  • Mahadev

    Mr. Shiv, Pankaja Munde is todays Lakshibai…..

close