निठारी हत्याकांड : सुरेंदर कोहलीला फाशीची शिक्षा

September 11, 2009 9:46 AM0 commentsViews: 2

11 सप्टेंबर निठारी हत्याकांडातला प्रमुख आरोपी सुरेंदर कोहलीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 2006 च्या डिसेंबरमध्ये उघडकीस आलेल्या नोएडामधील निठारी हत्याकांडातल्या रिंपा हलदर प्रकरणातील आरोपी मोनिंदर सिंग पंधेर याला अलाहबाद हायकोर्टानं निर्दोष ठरवलं आहे. तर दुसरा प्रमुख गुन्हेगार सुरेंदरकोहलीची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. पंधेरच्याच घरात काम करणार्‍या रिंपा हलदर या 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप, पंधेर आणि कोहलीवर होता. निठारी प्रकरणातली ही पहिली केस आहे.

close