कोण ठरणार स्टारमंत्री ?, सर्व्हेला जनतेचा उदंड प्रतिसाद

February 6, 2015 7:29 PM0 commentsViews:

team devendra 100 news06 फेब्रुवारी : कुठे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथम क्रमांकावर, तर कुठे त्यांच्याच मंत्रिमंडळाच्या ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे प्रथम क्रमांकावर, तर कुठे विनोद तावडे आणि सेनेचे एकनाथ शिंदे यांच्यात तिसर्‍या क्रमांकासाठी चढाओढ….अत्यंत रोमांचक अशी चुरशीची लढत ‘टीम देवेंद्र @100’च्या रेटिंग सर्व्हेमध्ये रंगली होती. पण वेळेअभावी आम्हाला रेटिंग सर्व्हे थांबवावा लागला. महाराष्ट्रासह देशा-विदेशातील वाचकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद या सर्व्हेला मिळालाय. त्यामुळे आता प्रतिक्षा आहे ती निकालाची…कोण ठरणार स्टारमंत्री ?

15 वर्षांच्या तपानंतर भाजप आणि शिवसेनेला सत्तेच फळ चाखण्याची संधी मिळाली. भाजपने सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे हे यश भाजपसाठी सर्वात मोलाच आणि महत्वाच आहे. भाजपने राज्याची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवलीय. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची छोटेखानी टीम कामाला लागलीये. सोबतीला शिवसेनेचे मंत्रीही आहेच.

बघता-बघता या ‘टीम देवेंद्र’ला शंभर दिवस पूर्ण झाले. फडणवीस सरकारने आपल्या ‘सहामाही’ परीक्षेतले 100 दिवस पूर्ण केले. या शंभर दिवसांतील मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्र्यांची कामगिरी कशी वाटली ? असा माफक सवाल आम्ही उपस्थित केला. यासाठीच आमच्या वेबसाईटवर मुख्यमंत्र्यांसह 14 मंत्र्यांच्या कामगिरीचा निवाडा करण्यासाठी खास असं रेटिंग बोर्ड तयार केलंय. या रेटिंग बोर्डमध्ये वाचकांना 0 ते 5 यानुसार स्टार रेटिंग द्यायचं होतं. तीन दिवस चाललेल्या मोहिमेला वाचकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. वाचकांनी मंत्र्यांच्या कामाचा हिशेबच या माध्यमातून दिला. अत्यंत चुरशीची अशी लढत या रेटिंग सर्व्हेमध्ये पाहण्यास मिळाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात तर थेट लढत रंगली होती. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री आघाडीवर होते, त्यानंतर दुसर्‍या दिवशी पंकजा मुंडेंनी आघाडी घेतली ती सर्व्हेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत कायम होती. तर तिसर्‍या स्थानावर दोन दिवस विनोद तावडे यांचं निर्वादीत वर्चस्व होतं. पण अचानक तिसर्‍या दिवशी गणित बदलं आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी तिसर्‍या स्थानावर झेप घेतली. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर सेनेचे रामदास कदम, सुभाष देसाई यांनी अनुक्रमे जागा मिळवली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची लढाई इथंही पाहण्यास मिळाली. पण हे सगळं होऊ शकलं वाचकांच्या रेटिंगमुळे त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. आज रात्री 8 वाजता आमच्या ‘टीम देवेंद्र @100′ या कार्यक्रमामध्ये कोणत्या नेत्याची कामगिरी सर्वोत्तम आहे ?, कोणता मंत्री सर्वाधिक लोकप्रिय आहे ? हे आम्ही जाहीर करूच…पण तोपर्यंत पाहत राहा आयबीएन लोकमत…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close