मायनिंग विरोधात सावंतवाडीत मोर्चा

September 11, 2009 9:57 AM0 commentsViews: 1

11 सप्टेंबर 'मायनिंग औष्णिक चले जाव फोरम'च्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहरात गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात काँग्रेस वगळता सर्व पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांचा जमावबंदी आदेश असतानाही काढलेल्या या मोर्चातअनेकांनी सहभाग घेतला. यात 300 जणांना अटक करुन नंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. एकीकडे भाजपा कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीमुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांबद्दल असंतोष असतानाच, या चळवळीमुळे येत्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांसमोर नवं आव्हान उभं झालं आहे. या मोर्चात ब्रिगेडीयर सुधीर सावंत, संदेश पारकर, पुष्पसेन सावंत, वसंत केसरकर, जयेन्द्र परुळेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

close