बेळगाव नाट्यसंमेलनाची ‘पहिली घंटा’ वादाची !

February 6, 2015 9:24 PM0 commentsViews:

Natyasamelan06 फेब्रुवारी : बेळगावमध्ये 95वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उद्यावर येऊन ठेपलं आहे पण संमेलनाची ‘पहिलीच घंटा’ वादाची ठरण्याची चिन्ह आहे. कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीने पुन्हा एकदा डोकंवर काढलं असून 21 जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे एकीकरण समितीने नाट्य परिषद आणि पोलिसांचा दबावापुढे झुकणार नाही असा इशारा दिलाय.

95वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन बेळगावमध्ये भरवण्यात आलंय. सुरुवातीपासूनच नाट्यसंमेलन वादातीत राहलंय. आता नाट्यसंमेलन एका दिवसांवर येऊन ठेपलं असताना बेळगाव पोलिसांची दडपशाही सुरू झालीये. नाट्यसंमेलनाला 21 अटींसह परवानगी देण्यात आलीये. नाट्यसंमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडू नये, भाषिक वाद हा मुद्दा असणारी नाटकं सादर करू नये, भाषणांमध्ये भाषिक वाद आणि संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा आणू नये, अशा स्वरुपाच्या या अटी आहेत. नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेते मोहन जोशी यांनी अजूनतरी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीने पोलिसी दडपशाहीच्या विरोधात एल्गार पुकारलाय. नाट्यपरिषद पोलीस आणि कर्नाटक सरकारपुढे झुकत असेल, आम्ही झुकणार नाही असा इशाराच महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलाय. उद्या संमेलनाच्या दिंडीत ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देणार, महाराष्ट्रातले देखावेही सहभागी होणार आणि या दिंडीत सीमाभागतले लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतील असंही समितीने जाहीर केलं. त्यामुळे उद्या बेळगाव पोलीस काय भूमिका घेते याकडे संगळ्याचं लक्ष लागलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close