सांगली-मिरज मधील जनजीवन पुर्वपदावर

September 11, 2009 10:03 AM0 commentsViews: 2

11 सप्टेंबर गुरुवारी सांगली-मिरजमध्ये गणेशमूतीर्ंचं शांततेत विसर्जन झालं. या विसर्जन मिरवणूकीत नेहमीचाच जल्लोष दिसत होता. मिरजमध्ये संचारबंदीत 3 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. तर सांगलीत 6 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी एका कमानीवरील अफजलखानाच्या चित्रावरुन मिरजमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर या ठिकाणी दंगल उसळली होती. या दंगलीचं लोण इचंलकरंजी, कोल्हापूर इथेही पोहचलं होतं. गेले पाच दिवस या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं होतं. आता संचारबंदी शिथिल करण्यात आल्याने या जनजीवन पुर्वपदावर येत आहे.

close