पकडा बिबट्याला !, रेस्क्यू ऑपेरशनचा थरार कॅमेर्‍यात कैद

February 7, 2015 1:37 PM0 commentsViews:

औरंगाबाद (7 फेब्रुवारी): ‘बिबट्या…’ वैजापूर तालुक्यातील बेळगाव शिवारात एका बिबट्याने गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातलाय. बिबट्याला पकडण्यासाठी वन अधिकारींचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे पण बिबट्या अजूनही काही तावडीत सापडला नाही. शुक्रवारी सकाळपासून वन अधिकार्‍यांचं ‘ऑपरेशन बिबट्या’ सुरूच आहे. बिबट्याने आतापर्यंत पाच जणांवर हल्ला केलाय.

vaijapur_bibtyaबळेगाव शिवारातील एका ओढ्यात लपून बसलेल्या बिबट्याने एका गावकर्‍यावर हल्ला केला. हल्लाकरून बिबट्या झुडपात जाऊन लपला. बिबट्या दिसला…म्हणता म्हणता गावभरात एकच बातमी वार्‍यासारखी पसरली. बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी गावकर्‍यांनीलाठ्या-काठ्या घेऊन ओढ्याकडे मोर्चा वळवला. तोपर्यंत वन विभागाचे कर्मचारीही परिसरात दाखल झाले. त्यानंतर सुरू झालं ‘ऑपेरशन बिबट्या’. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी सुरुवातील पिंजरा लावला; परंतु बिबट्याने वन अधिकार्‍यांच्या हातावर तुरी देऊन झाडावर जाऊन बसला. बिबट्या झाडावर बसल्यानंतर वन अधिकार्‍यांनी त्याला भुलीचे इंजेक्शन (ट्रॅब्युलाइज) मारले. काहीवेळानंतर बिबट्या झाडावरून खाली पडला खरा पण काहीवेळातच तो जागा झाला आणि विहिरीत उतरला. बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊनही तो पुन्हा उठल्यामुळे वनअधिकारीही गोंधळून गेले. नेमक बिबट्याचं काय चाललं हे पाहण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली होती. विहिरीत पाणी प्यायल्यानंतर भुलीची तीव्रता कमी झाली आणि बिबट्याने पुन्हा दोघांवर हल्ला केला. दुसर्‍यांदा इंजेक्शन दिल्यानंतर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी रिंगण केले; मात्र बिबट्याने आणखी एका वनाधिकार्‍याला जखमी केले. रात्री उशिरापर्यंत बिबट्याला पकडण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, वनविभागाच्या अधिकार्‍यांना बिबट्याला पकडण्यात अजूनही यश आलेलं नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close