अनुष्का निर्मात्याच्या भूमिकेत

February 7, 2015 1:58 PM0 commentsViews:

बॉलिवुडची अभिनेत्री अनुष्का शर्माने आता निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुष्काने प्रोड्यूस केलेला ‘NH 10′ या तिच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय. 6 मार्चला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाबद्दल बोलताना, ”हा चित्रपट प्रोड्यूस करताना मला खूप शिकायला मिळालं आणि मजाही आली. मला माझ्या को-प्रोड्यूसरची खूप मदत झाली. त्यामुळेच मी हा चित्रपट करू शकले.” अशी प्रतिक्रिया अनुष्काने दिली. विशेष, म्हणजे या चित्रपटात एकही गाणं नाही. आम्हाला वास्तवावर आधारीत चित्रपट साकारायचा होता त्यामुळे यात गाणं टाकण्यात आलं नाही, असंही ती म्हणाली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close