विनयभंगानंतर आरोपीने जमावावर उगारली तलवार !

February 7, 2015 3:05 PM0 commentsViews:

07 फेब्रुवारी : ठाण्यात 16 वर्षांच्या विद्यार्थिनीचा भर रस्त्यात तिन मुलांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सगळा प्रकार लोकांना कळताचं घटनास्थळी गर्दी होऊ लागली. आपण अडचणीत आल्याचं कळताचं त्या तीन आरोपींपैकी एका आरोपीने चक्क तलवारच बाहेर काढून, जमावाला धमकावायला सुरुवात केली.या आरोपींना कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. दरम्यान, या घटनेची कासारवडवली घटनेची पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी दखल घेतली आहे . पोलिसांनी हयगय न करता आरोपींना कडक शिक्षा करावी असे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close