वाहतुकीच्या कोंडी विरोधात विद्यार्थ्यांचं साखळी आंदोलन

September 11, 2009 12:17 PM0 commentsViews: 2

11 सप्टेंबर पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरच्या एकेरी वाहतुकीच्या विरोधात मॉडर्न शाळेतल्या दोन हजार मुलांनी मानवी साखळी आंदोलन केलं. गेल्याच आठवड्यात, यश वाघमारे या सहा वर्षांच्या मुलाचा अपघातात मृत्यु झाला होता. त्यामुळे हा वनवे रद्द करावा अशी जोरदार मागणी या विद्यार्थ्यांनी केली. मुलांच्या या मागणीला पालकांनी आणि शिक्षकांनीही पाठींबा दिला. हा रस्ता वनवे झाल्यामुळे या रस्त्यावरची वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे. पुढच्या काही वर्षांचा विचार करुन ही योजना राबवल्याचं वाहतुक शाखेचं म्हणणं आहे. पण महानगरपालिका आणि वाहतुक शाखेमध्ये समन्वय नसल्याने या योजनांमध्ये अनेक त्रृटी निर्माण झाल्या आहेत.

close