उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु

September 11, 2009 12:41 PM0 commentsViews: 1

11 सप्टेंबर शुक्रवार पासून मुंंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक सुरू झाली आहे. काँग्रेस बरोबरच्या आघाडीचा निर्णय होत नसल्यानं राष्ट्रवादी अधिक काळजी घेत आहे. आयबीएन लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहीतीवरून राष्ट्रवादीने प्रत्येक मतदारसंघातला आपला उमेदवार ठरवण्यास सुरूवात केली आहे. ज्या मतदारसंघात एकापेक्षा अधिक इच्छुक आहेत त्याठिकाणी जास्तीत जास्त तीन नावापर्यंत यादी वाढवण्याची तयारी पक्षाने ठेवली आहे. अखेरच्या क्षणी यातलं एकच नाव उमेदवार म्हणून घोषित केलं जाईल. शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाडा या विभागांच्या प्रमुख नेत्यांसोबत शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आर.आर.पाटील आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चर्चा करणं सुरू केलं आहे. शनिवारी कोकण, मुंबई आणि ठाणे याठिकाणचे उमेदवार अशाच पद्धतीने निवडले जाणार आहेत.

close