विलासराव देशमुख काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी

September 11, 2009 2:34 PM0 commentsViews: 2

11 सप्टेंबरकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विलासराव देशमुख यांची निवड केली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झालं आहे. निवडणुकांची रणनीती कशी असावी, कुणाला उमेदवारी द्यावी तसंच प्रचार कशा पद्धतीनं व्हावा. यासारख्या महत्वाच्या मुद्यांवर विलासराव निर्णय घेतील. राष्ट्रवादीसोबत निवडणूकपूर्व युती करु नये, ही जाहीर भूमिका घेतलेल्या विलासरावांना एवढं महत्वाचं पद देऊन काँग्रेसनं एकप्रकारे राष्ट्रवादीलाही संदेश दिला आहे. त्यामुळे केंद्रात मंत्री असलेले विलासराव देशमुख आता विधानसभा निवडणुकीतही अत्यंत महत्वाची भूमिका बजावतील.

close