मतदानाच्या दिवशीही ‘आप’चा किरण बेदींवर आरोपास्त्र

February 7, 2015 6:26 PM0 commentsViews:

Kiran bedi VS arvind kejriwalनवी दिल्ली (07 फेब्रुवारी) : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण मतदानाच्या दिवशीही दिल्लीच्या भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी मतदारांची भेट घेत आहेत. ही भेट घेताना त्यांची पळापळही झाली. पण याला आम आदमी पक्षानं आक्षेप घेतलाय.

निवडणुकीच्या दिवशी पदयात्रा काढणं हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केलाय ‘आप’नं याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रारही केलीय.

पण हा आचारसंहितेचा भंग नसल्याची माहिती निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी दिली आहे. आज सकाळी किरण बेदी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जात असताना त्यांनी मतदारांची भेट घेतली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close