दानवेच काँग्रेसच्या वाटेवर होते, माणिकरावांचा गौप्यस्फोट

February 7, 2015 7:46 PM1 commentViews:

manikrao on danveनागपूर (07 फेब्रुवारी ): काँग्रेस पक्षाचे आजी-माजी 22 आमदार भाजपमध्ये येण्याचा दावा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच मंत्रिपदाची वर्णी लागत नसताना काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केला. तसंच रावसाहेब दानवे यांनीच यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं असं आव्हानही माणिकराव ठाकरे यांनी केलं.

राज्यातील 21 आजी-माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला होता. एवढंच नाहीतर 21 आमदारांची यादी सुद्धा तयार आहे असा दावाही दानवे यांनी केला होता. दानवे यांनी गौप्यस्फोट केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. भाजपच्या नेत्यांनी तर सेनेचे आमदार फोडणार नाही अशी ग्वाही दिली. पण दानवे यांच्या गौप्यस्फोटाचा समाचार घेत काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केलाय.  युती सरकारच्या 100 दिवसांवर टीका करणारी ‘घोषणाबाज सरकारचे 100 दिवस’ या पुस्तिकेचे नागपुरात प्रकाशन झाले यावेळी माणिकराव ठाकरे नवा खुलासाच केलाय. भाजपमध्ये मंत्रिपदासाठी वर्णी लागणार नव्हती म्हणून रावसाहेब दानवे हेच काँग्रेसमध्ये येणार होते असा खुलासाच ठाकरेंनी केलाय. एवढंच नाहीतर खरं काय आणि खोटं काय याबद्दल दानवेंनीच स्पष्ट करावं असं आव्हानही केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • मनोज कोल्हे

    भाजप ने पराभव मान्य केला ……आता विकास कामे करा

close