शिवसेना भवनावरील बाळासाहेबांच्या फोटोला निवडणुक आयोगाचा आक्षेप

September 11, 2009 2:35 PM0 commentsViews: 123

11 सप्टेंबर दादरच्या शिवसेना भवनाबाहेर काचेवर लावलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं त्याला आक्षेप घेतला आहे. तर शिवसेना भवनावरचा बाळासाहेबांचा फोटो कोणत्याही परिस्थितीत काढणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनेचे नेते नाहीत तर महाराष्ट्राची अस्मिता त्यांच्यात दिसून येते. त्यामुळे असा आचरटपणा कोणी करू नये. तसंच लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा का काढला नाही, त्यावेळी कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल मनोहर जोशी यांनी केला आहे.

close