सर्व जागांवर लढण्याची काँग्रेसची तयारी

September 11, 2009 2:37 PM0 commentsViews: 6

11 सप्टेंबर सर्व जागांवर लढण्याची तयारी आहे आणि म्हणूनच काँग्रेस रणांगणात उतरली आहे, असं स्पष्ट करत काँग्रेसचे निवडणूक प्रचार प्रमुख सुशीलकुमार शिंदे यांनी अजूनही पक्षात स्वबळाचं वारं जोरात असल्याचे संकेत दिले आहेत. शनिवारी संसदीय समितीची बैठक असून त्यानंतर हायकमांडकडे उमेदवारांची यादी सोपवली जाईल, अस गांधी भवन इथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सुशिलकुमार शिंदे बोलत होते. दरम्यान विद्यमान आमदारांसाठी आपआपल्या कोट्यातली जागा सोडण्यात याव्यात असं आवाहन कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलं आहे. दोन्ही कॉग्रेसमध्ये विरोधी पक्षातल्या काही विद्ममान आमदारांनी प्रवेश केला आहे.

close