काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरांच्या भाषणादरम्यान शिवसैनिकांचा राडा

February 8, 2015 4:44 PM0 commentsViews:

rada

08 फेब्रुवारी :  संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ थीमपार्कच्या भूमिपूजन सोहळ्यात शिवसैनिक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या कार्यकर्त्यांमधे शाब्दिक चकमक उडाली. कोळंबकरांच्या भाषणादरम्यान शिवसैनिकांनी गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काँग्रेसचे नायगावमधील आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाषणादरम्यान, स्प्रिंग मिलमध्ये घरं मिळवण्यासाठी गेली 22 वर्षं मी संघर्ष केल्याचं म्हटलं. या विधानावर आक्षेप घेत शिवसैनिकांनी हे खोटं असल्याच्या घोषणा दिल्या आणि त्याला कोळंबकर समर्थकांनी विरोध केला. त्यामुळे भाषणादरम्यानच एकच गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडेंच्या उपस्थितीतच हा गोंधळ झाला.

संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा धगधगता इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, या लढ्याच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून नायगावच्या बॉम्बे डाइंग भूखंडावर ‘संयुक्त महाराष्ट्र’ चळवळीचे थीम गार्डन महापालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close