जन्मठेप भोगून आलेल्या संतोष शिंदेंची आदर्शगाथा

February 8, 2015 2:09 PM0 commentsViews:

हलीमा कुरेशी, पुणे
08 फेब्रुवारी :  जन्मठेप भोगून आल्यानंतर संतोष शिंदे स्वतःच्या कर्तृत्वावर मुख्य प्रवाहात आले आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सुधारण्याची इच्छा असणार्‍यांसाठी आदर्श काहाणी.

पुण्यातील विश्रांतवाडीत एक साधं सरळ आयुष्य जगणार्‍या संतोष शिंदेंकडे बघून कोणीही म्हणणार नाही की त्यांनी खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगली आहे. पण हे खरं आहे. वयाच्या अठराव्या वर्षीचं संतोष शिंदेंच्या हातून एकाचा खून झाला. रागाच्या भरात घडलेल्या या गुन्ह्याची त्यांनी सोळा वर्षाची जन्मठेप भोगली. पण शिक्षा भोगत असतानाही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. कारागृहात असतानाच त्यांनी तब्बल अकरा पदव्या मिळवल्या आहेत. याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली. तुरुंगातून बाहेर पडताना इतक्या पदव्या हाती असल्याने आपल्याला कोणीही पटकन नोकरी देईल असं त्यांना वाटलं होतं, पण तसं काहीचं झालं नाही.

जीवन बदलायचा ध्यास घेतलेल्या संतोश शिंदे प्रयत्न सुरुच ठेवले आणि अखेर उदय जगतापांच्या सामाजिक संस्थेने त्यांना सामावून घेतलं. याच काळात त्यांचे मनाली या उदयोन्मुख समाजसेविकेशी मैत्रीचे संबंध जुळले आणि 14 फेब्रुवरी 2011 या व्हॅलेंटाईन डेला ते लग्नाच्या बंधनात अडकले.

उदय जगताप यांच्या सामाजिक संस्थेने आजवर 26 कैद्याचं पुनर्वसन केले आहे. खरंतर रागाच्या भरात अनेकांच्या हातून गुन्हे घडतात. त्यांची त्यांना शिक्षाही भोगावी लागते, पण म्हणून त्यांना जगण्याचा हक्कच का नाकारायचा, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close