काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा निर्णय दोन दिवसात

September 12, 2009 8:25 AM0 commentsViews: 7

12 सप्टेंबरविधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेण्याचं दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत ठरवण्यात आलं. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला विलासराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे, मुकूल वासनीक अहमद पटेल यांच्यासह अनेक नेते हजर होते. या नेत्यांनी आघाडीबाबत आपापली मतं हायकमांडला कळवली आहेत, असं काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी सांगितलं आहे. दोनच दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात आघाडी झाली नाही तर धर्मांध शक्तींना फायदा होऊन सेना-भाजपची सत्ता येईल असं म्हटलं होतं.

close