शरद पवार भाषणात जय महाराष्ट्र का म्हणाले नाही?- रावते

February 8, 2015 8:34 PM0 commentsViews:

rawate

08 फेब्रुवारी :  शरद पवार भाषणात जय हिंद म्हणाले पण जय महाराष्ट्र का म्हणाले नाही, असा सवाल उपस्थित करत परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.

बेळगावमध्ये सुरू असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा आज (रविवारी) समारोप झाला. या संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला दिवाकर रावते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना दिवाकर रावते यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा मांडला.मराठी अस्मिता टिकवली पाहिजे असं सांगतानाच उद्घाटनाच्या भाषणावरून त्यांनी शरद पवारांवर कडाडून टीका केली. उद्घाटनच्या भाषणाचा शेवट पवारांनी ‘जय महाराष्ट्र’ न म्हणता केवळ ‘जय हिंद’ म्हणून केला. पण बेळगावातल्याच दुसर्‍या एका कार्यक्रमात पवारांनी जय कर्नाटक म्हटले, असं म्हणत रावतेंनी पवारांची ती क्लीपही कार्यक्रमात ऐकवली.

दरम्यान, नाट्यसंमेलन शिस्तीत पार पडलं पाहिजे, त्यासाठी एक पाऊल थांबावं लागलं तरी चालेल, अशी उद्धव ठाकरेंचीही इच्छा असल्याचं रावते म्हणाले. मराठी आईची ओळख करणारं ममत्वाचं नाट्यसंमेलन शिस्तीत पार पाडलं पाहिजे, बाकी प्रश्न लढायला आपण मोकळे आहोत, असं म्हणत रावतेंनी सीमावादावर शिवसेनेची भूमिका मवाळ नाही, असंही सूचकपणे मांडलं.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close