काँग्रेसच्या रास्ता रोको आंदोलनाचा फज्जा

February 9, 2015 12:58 PM0 commentsViews:

congress_pune andolanपुणे (09 फेब्रुवारी) : महागाईच्या प्रश्नावर काँग्रेस आज राज्यभर रास्तारोको आंदोलन करतंय. मुंबई वगळता इतर ठिकाणी काँग्रेसनं हे आंदोलन सुरू केलंय. पण पुण्यात या आंदोलनाचा फज्जा उडाला.

पुण्याच्या जंगली महाराज रोडवर झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ काँग्रेस आंदोलन करतंय. पण आंदोलनाचं योग्य नियोजन नसल्यानं आंदोलन करणार्‍यांचा गोंधळ उडालाय. मोजक्याच कार्यकर्त्यांची गर्दी जमल्यामुळे रास्ता रोको फसलाय. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करूनही वाहतूक सुरळीत सुरू होती.

एकीकडे कार्यकर्ते भाजप सरकार विरोधात घोषणा देत होते तर दुसरीकडे वाहनांनी रास्ता रोकोतून व्यवस्थित मार्ग काढला होता. त्यामुळे हा रास्ता रोको होता की रास्ता छोडो आंदोलन अशी अवस्था आंदोलनाची झाली होती. तर ठाण्यात ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close