स्वीस बँकेत भारतीय खातेदार वाढले, 25 हजार 420 कोटींची माया जमा !

February 9, 2015 2:49 PM1 commentViews:

hsbc bank409 फेब्रुवारी : परदेशी स्वीस बँकेत किती भारतीयांनी आपली काळी माया साठवून ठेवली याबद्दल वारंवार खुलासे झाले. पण 2011 च्या तुलनेत काळा पैसाधारकांची संख्या आता दुप्पट झालीये असा गौप्यस्फोट ‘इंडियन एक्स्प्रेस’ने केलाय. HSBC बँकेत परदेशी खात्यांमध्ये 1195 भारतीय नागरिकांची खाती आहेत. या खात्यांमध्ये एकूण तब्बल 25 हजार 420 कोटींची माया जमा आहे.

काळा पैशा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने एसआयटीची स्थापन केली असून चौकशी सुरू आहे. स्वीस बँकेनं 2011 साली 628 जणांची नावं भारत सरकारकडे सुपूर्द केली होती. पण आता एचएसबीसी बँकेत भारतीय खातेदारांची संख्या कमी झाली नाहीतर ती दुप्पटीने वाढलीये. नेमकी कुणा-कुणाची खाती आहे ?, यासाठी इंडियन एक्स्प्रेसने ‘स्वीसलीक्स’नावाने शोध मोहिम हाती घेतली. तीन महिने चाललेल्या या मोहिमेसाठी वॉशिंग्टन येथील आयसीआयजे आणि पॅरिस मधील ‘ला मौंड’ या वृतपत्राची साथ घेण्यात आली होती. तीन महिन्यांच्या शोध मोहिमेअंती इंडियन एक्स्प्रेसने आज ऑपरेशन ‘स्वीसलीक्स’ जाहीर केलं. एचएसबीसी बँकेत 2011 च्या तुलनेत खातेदारांचा आकडा आता 1195 वर पोहचलाय. या खातेदारांच्या यादीत देशातील बडे उद्योगपती, हिरे व्यापारी, राजकारणी आणि अनिवासी भारतीय यांचा समावेश आहे. काही हिरे व्यापारी परदेशात स्थायिक झाले आहे. पण त्यांच्या खात्याचे पत्ते हे मुंबईतील असल्याचा दावाही करण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Pravin Ankushrao Thale

    मोदी साहेब तुम्ही सत्तेवर आल्यापासून स्विस बँकेत भारतीय खातेदार वाढले? तुम्ही आम्हाला फसविले. तुम्ही काळा पैसा भारतात आणणार नाहीत याची आता खात्री होत आहे. तुम्ही फक्त घोषणाच करता.

close