नवी मुंबई-अतिक्रमण घोटाळा : 5 वरिष्ठ अधिकारी निलंबित

September 12, 2009 8:28 AM0 commentsViews: 2

+12 सप्टेंबर नवी मुंबई-अतिक्रमण घोटाळा प्रकरणी 5 वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. या अधिकार्‍यांना अतिक्रमण भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी आजारीपणाचं सोंग करून जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या पाचही अधिकार्‍यांना शनिवारी अखेर सेवेतून निलंबित करण्यात आलं. घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नगरसेवक मनोहर मढवी याला अटक केल्यानंतर या पाच अधिकार्‍यांना अटक करण्यात आली होती. शनिवारी जरी या पाचही अधिकार्‍यंाना जामीन मंजूर झाला असला तरीही निलंबनाची कारवाई मात्र टळू शकली नाही.

close