पकिस्तानातून भारतीय हद्दीत रॉकेट्स मारा

September 12, 2009 8:31 AM0 commentsViews: 1

12 सप्टेंबर पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत शुक्रवारी रात्री 2 रॉकेट्स मारा करण्यात आला. अमृतसरजवळच्या मोधे आणि धोनेयाखुर्द या गावातल्या शेतात ही रॉकेट्स येऊन पडली. सीमा सुरक्षा दलानं परिसरात जाऊन याचा तपासही केला. त्याचबरोबर या रॉकेट हल्ल्याला ताबडतोब उत्तरही देण्यात आलं. पाकिस्ताननं मात्र असा हल्ला केल्यांच नाकारलं आहे. या हल्ल्यात कुणीही जखमी झालेलं नाही. जुलै महिन्यातही पाकिस्तानने तीन रॉकेट्सचा मारा भारतीय हद्दीत केला होता.

close