तृप्ती माळवींच्या राजीनाम्याचा मुहूर्त 16 फेब्रुवारीला !

February 9, 2015 7:11 PM0 commentsViews:

trupti malvi444 कोल्हापूर (09 फेब्रुवारी) : लाच प्रकरणी अखेर कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी या आता 16 फेब्रुवारीला आपला राजीनामा देणार आहेत. 16 फेब्रुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपण राजीनामा देणार असं खुद्द माळवी यांनी जाहीर केलं.

आज कोल्हापूर महापालिकेमध्ये विशेष सभेच आयोजन करण्यात आलं होतं. त्यात माळवी राजीनामा देणार अशी चर्चा होती. पण त्यांनी आजच्या सभेत आपला राजीनामा दिला नाही. पण सभेनंतर माळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना 16 तारखेला विशेष सभा बोलावली असून त्या सभेत आघाडीच्या धर्मानुसार राजीनामा देणार असल्याचं सांगितलंय. पालिकेमध्ये दोन्ही काँग्रेसची सत्ता असल्यानं माळवी यांचा कार्यकाळ आता पूर्ण झालाय. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. पण लाच प्रकरणात आपण दोषी नाही असं सांगत माळवी यांनी राजीनाम्यासाठी आपल्यावर कुठलाही दबाव नसल्याचंही स्पष्ट केलंय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close