म्हाडाचे जॉईंट सीईओ विजय कळम-पाटील यांना अटक

September 12, 2009 8:41 AM0 commentsViews: 12

12 सप्टेंबर म्हाडाचे जॉईंट सीईओ विजय कळम-पाटील यांच्यासह विजय पेठारे यांना अडीच लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. ऍन्टी करप्शन ब्युरोनं त्यांना लाच घेताना अटक केली. वडाळ्याच्या आदर्श गृहनिर्माण संस्थेची दुरुस्ती करण्यात येणार होती. त्यासाठी तिथल्या नागरिकांना संक्रमण शिबिरात हलवण्यात आलं होतं. मात्र संक्रमण शिबिरात हलवल्याबद्दल तिथल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचं भाडं देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे 75 लाख रुपयांचा दंड म्हाडाने संबंधित बिल्डरला भरायला सांगितलं होतं. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी बिल्डरकडून विजय कळम-पाटील आणि पेठारेंनी पैसै मागितले होते. त्यामुळे बिल्डरनं तक्रार केल्यानंतर अँन्टी करप्शन ब्युरोनं त्यांना जाळ्यात पकडलं.

close