पुनर्विवाहानंतरही कुटुंबनिवृत्तीवेतन सुरू राहणार !

February 9, 2015 10:01 PM1 commentViews:

mungantiwar_34509 फेब्रुवारी : पुनर्विवाह केल्यानंतरसुद्धा विधवा कर्मचार्‍यांना कुटुंबनिवृत्तीवेतन सुरू राहील अशी महत्वपूर्ण घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सध्याच्या नियमानुसार पुनर्विवाहानंतर विधवांना कुटुंबनिवृत्तीवेतन दिलं जात नव्हतं. या नियमात आता सुधारणा करण्यात आलीय. राज्यपालांच्या मान्यतेनंतर याबाबतची अधिसूचना काढली जाणार आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील तरतुदीनुसार विधवा कर्मचार्‍याच्या बाबतीत मृत्यूचा दिनांक किंवा पुनर्विवाहाचा दिनांक यापैकी जो अगोदरचा असेल त्या दिनांकापर्यंत कुटुंबनिवृत्तीवेतन देय होते.

आता यात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे विधवा कर्मचार्‍यांना कुटुंबनिवृत्तीवेतन सुरूच राहणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vinayakrao Bhavsar

    राज्य सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जुलै, 2014 पासून सुधारणा करण्याबाबत…राज्य सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना 7 टक्के महागाई भत्त्याच्या आदेशची प्रतिक्षा आहे. तत्कलीन फाइनेंस मिनिस्टर यांनी डी.ए मजूर कर्न्यास हेटुपूरसर डिरंगयी केली. केंद्र शसानाने सेप्ट 2014 लागू केला. 6 माहिने लोटुनही अजुनही 7% डी.ए. मिळाले नही. कृपा करुण अपन लक्षा घालावे ही कलकालिची वीनंटी.

close