टाडाफेम सुधाकर चव्हाणांचा मनसेत प्रवेश

September 12, 2009 8:48 AM0 commentsViews: 6

12 सप्टेंबर टाडाखाली गुन्हा दाखल झालेल्या सुधाकर चव्हाण यानं मनसेत प्रवेश केला आहे. सुधाकर चव्हाण ठाण्यातून इच्छुक आहे. त्यांच्या नावाचा विचार करू असं आश्वासन राज ठाकरे यांनी त्यांना दिलं आहे. नोव्हेंबर 1998 मध्ये सुधाकर चव्हाण आणि इतर 26 जणांवर टाडा कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. अरुण मुदलियार या बिल्डरवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता. आर्म्स ऍक्ट नुसारही सुधाकर चव्हाणवर गुन्हा नोंद झाला होता. याशिवायही सुधाकर चव्हाणवर अनेक गुन्हे दाखल आहेत.

close