विजय अदभूत, पण अहंकार बाळगू नका -केजरीवाल

February 10, 2015 1:00 PM0 commentsViews:

kejriwal speech

नवी दिल्ली (10 फेब्रुवारी) : हा विजय अदभूत असून दिल्लीतील जनतेचा आहे. हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे आणि सत्याचा आहे असं सांगत केजरीवाल यांनी विजयाचं श्रेय दिल्लीकर आणि कार्यकर्त्यांना दिलं.  तसंच यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना समजही दिला. या विजयाचा अहंकार बाळगू नका, कारण याच अहंकारामुळेच भाजप, काँग्रेसचा पराभव झालाय असं आवाहनही केजरीवाल यांनी केलं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. आम आदमी पार्टीने बहुमताचा आकडा पार करुन एकहाती सत्ता राखली आहे. या विजयानंतर केजरीवाल यांनी पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा आपला विजय नसून, लोकांचा आणि सत्याचा विजय आहे. आमच्याकडे पैसेही नाहीत आणि साधनंही नाहीत. पण सत्याच्या मार्गावर चालल्यानंतर सर्वजणं आपल्याला मदत करतात असं म्हणत केजरीवालांनी या विजयाबद्दल ‘आप’ला पाठिंबा देणार्‍या सर्व दिल्लीकरांचे आभार मानले आहेत. बहुमत एवढे मोठे असल्यामुळे आपल्याला भीतीही वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीतील गरीब आणि श्रीमंत जनतेला एकत्र घेऊन दिल्लीचा विकास करायचा असल्याचं ही त्यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी त्यांनी आपल्या पत्नी आणि कुटुंबियांच्या पाठिंब्या शिवाय हा विजय शक्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत केजरीवालांनी आपल्याला सर्वांना मिळून दिल्लीकरांची सेवा करायची आहे, असं सांगितलं आहे.  त्याशिवाय कार्यकर्त्यांनी विजयाचा अहंकार करू नये, काँग्रेस आणि भाजपचा पराभव अहंकारामुळेच झाला.आपणही अहंकार दाखवला तर जनता आपल्यालाही आपली जागा दाखवेल असा समज केजरीवालांनी कार्यकर्त्यांना दिला. विजयानंतर आता थोडी भीतीही वाटतं असून पण जनतेनं सोपवलेली जबाबदार पूर्ण करायची आहे असं ही त्यांनी म्हटलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close