मोदींकडून केजरीवालांचं अभिनंदन,’चाय पे चर्चे’चं दिलं आमंत्रण

February 10, 2015 12:30 PM0 commentsViews:

kejriwal modi10 जानेवारी : दिल्ली विधानसभेच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवालांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं. तसंच केजरीवालांना ‘चाय पे चर्चा’ करण्यासाठी आमंत्रणही दिलं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झालाय. आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलाय. 65 जागा जिंकत आप ने विरोधकांना धोबीपछाड दिलाय. भाजपला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारलीय. त्यापूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांना फोन करून अभिनंदन केलं .आणि विजयाच्या शुभेच्छाही दिल्या. केजरीवाल यांच्या सरकारला पूर्ण सहकार्य करू आणि दिल्लीच्या विकासासाठी केंद्राचं पूर्ण सहकार्य मिळेल असं आश्वासनही मोदींनी दिलं. तसंच मोदी यांनी केजरीवाल यांना चाय पे चर्चेसाठी आमंत्रणही दिलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close