भाजपचा आशेचा ‘किरण’ही मावळला, किरण बेदी पराभूत

February 10, 2015 2:33 PM0 commentsViews:

kiran bedi 4563410 फेब्रुवारी : सत्ताधारी भाजप सरकारला राजधानी दिल्लीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पण भाजपला आणखी एक धक्का बसलाय. विजयाच्या आशेनं ज्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारी सोपवली होती त्या किरण बेदीही पराभूत झाल्यात. कृष्णानगरमधून आपचे उमेदवार एस.के.बग्गा यांनी बेदी यांचा 1150 मतांनी पराभव केलाय. या पराभवाबद्दल किरण बेदी यांनी कार्यकर्त्यांपासून ते पक्षाची जाहीर माफी मागितलीये.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली खरी पण ‘आप’च्या त्सुनामीमुळे मोदी लाट पूर्णपणे ओसरली. एवढंच नाहीतर ज्यांच्यावर धुरा सोपवण्यात आली त्या किरण बेदींचाही पराभव झाला. किरण बेदींनी पत्रकार परिषद घेऊन आपला माफीनामाच सादर केला. बेदी म्हणाल्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्याला संधी दिली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली होती. पण त्यांचा विश्वास म    ी पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे मी पक्षाची आणि सर्व कार्यकर्त्यांची माफी मागते. आयुष्यात आजपर्यंत अनेक चढउतार पाहिले पण पहिल्यांदाच अशा पराभवाला सामोरं जावं लागतंय अशी भावना बेदींनी व्यक्त केली. भलेही लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही पण प्रचाराच्या दरम्यान, मतदारांनी आपल्याला खूप प्रेम दिलं. माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकं तासंतास ताटकाळात होते. त्या सर्वांचे मी आभार मानते. कृष्णानगरच्या जनतेनं जरी मला नाकारलं असंल पण तरीही मी त्यांची आभारी आहे. मी, कृष्णानगरमध्ये एक विकासाचं मॉडल आणू इच्छित होते पण आता ही जबाबदारी विजयी उमेदवारावर आहे असंही बेदी म्हणाल्यात. केजरीवाल यांना मी पाच वर्षांपासून ओळखते. त्यांच्या या मेहनतीचे हे फळ आहे. त्याला मी पूर्ण मार्क्स देते. पण त्यांनी जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करावी अशी मागणीही केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close