निवडणुकीसाठी बोगस होलोग्राम मनसेने पकडले

September 12, 2009 8:54 AM0 commentsViews: 5

12 सप्टेंबर निवडणुकीतल्या मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या इलेक्शन कार्डवर लावण्यात येणारे बोगस होलोग्राम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. नाशिकच्या गोरेवाडी नगर झोपडपट्टीत या बोगस होलोग्रामचा साठा मनसेच्या कार्यकर्त्यानी काही दिवसांपूर्वी पकडला होता. हे बोगस होलोग्राम शनिवारी पत्रकार परिषदेत दाखवले. राज ठाकरेंनी सरकारवर यावेळी चांगलच तोंड सुख घेतलं. या बोगस होलोग्रामसंदर्भात चौकशी करावी या मागणीसाठी निवडणूक आयोगाकडे मनसेचं एक शिष्टमंडळ जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

close