अमेरीकन ओपन मध्ये पेस आणि कॅरा ब्लॅकचा पराभव

September 12, 2009 10:11 AM0 commentsViews: 4

12 सप्टेंबर अमेरिकन ओपनच्या मिक्स्ड डबल्स स्पर्धेत लिअँडर पेस आणि कॅरा ब्लॅकला पराभव पत्करावा लागला आहे. अमेरिकेच्या कार्ली गुलिकसन आणि ट्रेव्हिस पॅरट या जोडीने त्यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला. पण हा पराभव मागे टाकून पेस आता पुरुषांच्या डबल्ससाठी सज्ज झाला आहे. या फायनलमध्ये पेसची गाठ पडणार आहे ती भारताच्याच महेश भूपतीशी. पेस आणि लॉही जोडीला चौथं सिडिंग मिळालं आहे. तर भूपती आणि नोवेल्सला तिसरं. पेस आणि भूपती दोघंही डबल्समध्ये गेली काही वर्षं सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. पण ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या फायनलमध्ये एकमेकांसमोर येण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. महेश भूपतीने यापूर्वी अकरा ग्रँडस्लॅम जिंकलेत. तर पेसच्या खात्यात 9 ग्रँडस्लॅम विजेतेपदं जमा आहेत.

close