विजेंदरला ब्राँझ मेडल

September 12, 2009 10:13 AM0 commentsViews: 1

12 सप्टेंबर भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर कुमारला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं आहे. सेमी फायनलमध्ये उझबेकिस्तानच्या अटोव्ह अब्बासने त्याचा पराभव केला. विजेंदरचा पराभव झाला असला तरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल मिळवणारा तो पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे. त्याचा प्रतिस्पर्धी अटोव्ह 81 किलो वजनी गटातला चॅम्पियन आहे. शुक्रवारच्या मॅचमध्ये काहीशा सावध सुरुवातीनंतर त्याने मॅचवर पूर्णपणे वर्चस्व मिळवलं. जोरदार ठोसे लगावत त्याने विजेंदरला जेरीला आणत अखेर 7-3 ने विजय मिळवला.

close