कॉमपॅक कपमध्ये भारताची विजयी सलामी

September 12, 2009 10:16 AM0 commentsViews: 1

12 सप्टेंबर श्रीलंकेत सुरु असलेल्या कॉमपॅक कपमध्ये भारतीय टीमने शनिवारी विजयी सुरुवात केली. शनिवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भारतीय बॉलर्स आणि बॅट्समनची कामगिरी सातत्यपूर्ण झाली. आशीष नेहरा आणि युवराज सिंग यांनी आधी न्यूझीलंडला 155 रन्समध्ये गुंडाळलं. मग सचिन तेंडुलकरचे 46, धोणी आणि सुरेश रैनाच्या पार्टनरशिपमुळे सहा विकेट राखून मॅच जिंकली. या मॅच मध्ये तिन विकेट् घेणारा आशीष नेहरा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. शनिवारी भारतीची दुसरी मॅच यजमान श्रीलंकेशी होणार आहे. शुक्रवारच्या मॅचमध्ये मिळवलेल्या विजयामुळे भारताचा फायनलमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.

close