काँग्रेसचा सुपडा साफ, 63 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

February 10, 2015 9:45 PM0 commentsViews:

ajay maken345310 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या ‘त्सुनामी’त काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. तीन टर्म सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसला साधा भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसचे सर्वच वरिष्ठ उमेदवार पराभूत झाले आहे. एवढंच नाहीतर काँग्रेसच्या 70 पैकी तब्ब्ल 63 उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. त्यामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अजय माकन, किरण वालिया, हारून युसुफ अशा महत्त्वाच्या नेत्यांचाही समावेश आहे. तसंच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनाही अनामत रक्कम वाचवता आली नाही.

15 वर्ष दिल्लीचे तख्त सांभाळणार्‍या काँग्रेसला मागील निवडणुकीत आम आदमीच्या एंट्रीमुळे लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मागील निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत होऊन फक्त 8 जागांवर समाधान मानावे लागले होते. या निकालामुळे काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना राजकीय सन्यासच घ्यावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा मोर्चेबांधणी केली खरी पण दिल्लीकरांनी पुन्हा एकदा काँग्रेसला तोंडघाशी पाडलं. काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. आजपर्यंतच्या इतिहासात काँग्रेसचा हा सर्वात मोठा आणि लाजिरवाणा पराभव अशीच याची नोंद झालीये.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close