विनोद तावडेंना आमदारकी नारायण राणेंमुळे – निलेश राणे

September 12, 2009 1:34 PM0 commentsViews: 13

12 सप्टेंबर विनोद तावडेंना विधान परिषदेची आमदारकी ही नारायण राणे यांच्यामुळे मिळाली आहे, असं खासदार निलेश राणे यांनी स्पष्ट करीत तावडे यांनी राणेंच्या उपकाराची जाण ठेवावी असं सुचित केलं आहे. भाजपा कार्यकत्यांवर कॉग्रेस कार्यकत्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर कॉग्रेसचे खासदार निलेश राणे यांनी कणकवलीत शनिवारी पत्रकार परिषद घेतली . यावेेळी निलेश राणे यांनी भाजपा प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर जोरदार टिका केली. दोनच दिवसांपूर्वी कणकवलित भाजपाच्या कार्यकर्त्यांना राणे समर्थकांनी मारहाण केली होती. त्यानंतर विनोद तावडे यांनी कणकवलीत जाऊन नारायण राणे यांच्यावर टिका केली होती.

close