आता ‘आप’चं लक्ष्य मुंबई महापालिका

February 11, 2015 1:09 PM1 commentViews:

BMC kejriwal

11 फेब्रुवारी : दिल्लीत विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने आता मुंबईच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. ‘आप’ मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर होणार्‍या महापालिका निवडणुकीच्या मैदानात शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि अन्य पक्षांसमोर ‘आम आदमी’चं मोठं आव्हान असणार आहे.

आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील अभूतपूर्व विजयाचे पडसाद आता जागोजागी उमटू लागले आहेत. महापालिका निवडणुकीपर्यंत सामान्य जनतेवर ‘आप’चा प्रभाव असाचं टिकवण्याचे आव्हान मुंबईतील आम आदमी पार्टीच्या नेत्यांसमोर आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं अस्तित्व केवळ नावापुरतेच आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका सोप्या झाल्याची सेना-भाजपची समजूत होती. मात्र दिल्लीत नव्या दमाने मुसंडी मारणार्‍या आम आदमी पार्टीला मुंबईत कमी लेखण्याची चूक राज्यातील अन्य पक्ष करणार नाही, हे ही तितकचं खरं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • vijay

    WHERE THE MIND IS WITHOUT FEAR AND THE HEAD IS HELD HIGH ( IN PRIDE AND WITH A LOT OF PATIENCE OF UNIQUE KIND ) WE THE PEOPLE OF THIS GREAT NATION OF PEACE PEACE AND PEACE ALONE DO CERTAINLY HAVE THE GREAT PRIDE IN OUR PERFECTLY PEACEFUL MEANS OF OUR MUCH AND YET MORE FAMOUSLY SAID THE HUGE DEMACRACY OF UNIQUE KIND ????

close