राजसिंग डुंगरपूर यांचं निधन

September 12, 2009 1:36 PM0 commentsViews: 2

12 सप्टेंबर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांचं शनिवारी दुपारी मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. पण क्रिकेटमध्ये मैदानापेक्षा मैदानाबाहेरची त्यांची कामगिरी भारतीय क्रिकेटमध्ये अधिक गाजली. बीसीसीआयचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. त्यानंतर चार वर्षं ते निवड समितीचे अध्यक्ष होते. भारतीय टीमच्या चार परदेश दौर्‍यात त्यांनी टीम मॅनेजर म्हणूनही काम पाहिलं होतं. शेवटपर्यंत ते क्रिकेटशी संबंधित होते. सध्या ते मुंबईतल्या सीसीआय क्लबचे अध्यक्ष होते. डुंगरपूर स्वत: राजस्थान तर्फे 86 फर्स्ट क्लास मॅच खेळले होते. आपल्या फास्ट मिडियम बॉलिंगने त्यांनी तब्बल 206 विकेट्स घेतल्या. सोळा वर्षं ते फर्स्टक्लास क्रिकेट खेळले. काही वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणातही प्रवेश केला होता. भारतीय जनता पार्टीचे ते सदस्य होते.

close