भाजपने किरण बेदींचा बळीचा बकरा केला-अण्णा हजारे

February 11, 2015 5:31 PM0 commentsViews:

anna on bjp_news_ibnlokmat interview11 फेब्रुवारी : दिल्ली निवडणुकीत भाजपने डाव साधला असून किरण बेदींचा बळीचा बकरा केला अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अमित शहा यांचं नाव न घेता केली. तसंच केजरीवाल यांच्याविरोधात बेदींना उभं करून विजय मिळेल हा भाजपचा भास होता असा टोलाही अण्णांनी भाजपला लगावला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आम आदमी पार्टीने एकहाती सत्ता राखली. अरविंद केजरीवाल यांनी मोदी लाट परतवून लावण्याचा पराक्रम केलाय. तर दुसरीकडे भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल हे दोन्ही निवडणुकीच्या आखाड्यात विरोधात होत पण ते एकेकाळी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातले प्रमुख सदस्यही होते. त्यामुळेच आपल्या या दोन शिष्याबद्दल अण्णांना काय वाटतं याची उत्सुक्ता सर्वांना होती. अण्णांनी आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत अण्णांनी आपल्या शिष्यांची बाजू घेत भाजपवर तोफ डागली.

15 दिवसांअगोदर किरण बेदींना अचानकपणे तिकीट देण्यात आलं. आणि त्यांना लगेच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं. एवढं झटपडपणे असं होतं नसतं. मुख्यमंत्रिपदासाठी झीजावर लागतं, लोकांसाठी काहीतरी करावं लागलं असा टोला अण्णांनी भाजपला लगावला. त्याचवेळी त्यांनी आपल्या शिष्य किरण बेदींचीही पाठराखण केली. किरण बेदीनेही सामाजिक कार्य करतायत हे नाकारता येणार नाही. पण समाजासोबत एक नाळ जोडायची असती त्यात बेदी थोड्या कमी पडल्यात. केजरीवाल आणि बेदी एकत्र आंदोलनात काम करत होते. याचाच भाजपने डाव साधला. केजरीवाल यांच्या विरोधात किरण बेदींना उभं केलं तर विजयी होऊ असा भास भाजपला झाला पण तो दिल्लीकरांनी साफ खोटा ठरवला खरंतर बेदींचा भाजपने बळीचा बकरा केला अशी टीका अण्णांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचं नाव न घेता केली.

तर दुसरीकडे अण्णांनी केजरीवाल यांची पाठ थोपटली. अरविंद केजरीवाल एवढी वर्ष झिजतोय. माझ्यासोबत काम केलंय. दिल्लीतील समस्यांबाबत त्याला चांगलं माहित आहे. लोकांशी त्याचा जनसंपर्क आहे. त्याच्या या विजयासाठी ही कारण पुरेशी आहे. खरंतर आम आदमी पक्षाचा जन्म हा आमच्याच आंदोलनातून झाला अशी आठवणही अण्णांनी करून दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close