मंत्री करतायत जनतेच्या पैशाची बचत

September 12, 2009 1:50 PM0 commentsViews: 3

12 सप्टेंबर देशभरात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवरची भार कमी करावा म्हणून केंदि्रय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी इकॉनॉमी क्लासने प्रवास केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी केलेल्या सरकारी खर्च कमी करण्याच्या आवाहनाला अनेक केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिसाद दिलाय. विलासरावांसह ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदेनीही विमानाच्या इकॉनॉमी क्लासनं प्रवास केला. इतकंच नाही तर नागरी उड्डान मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही इकॉनॉमी क्लासनं प्रवास केला. याआधी शशी थरुर आणि एस. एम. कृष्णा यांनी आपलं बस्तान फाईव्ह स्टार हॉटेलमधून हलवलं होतं.

close