पुन्हा गारपीट, अवकाळी पाऊस बळीराजाच्या जीवावर !

February 11, 2015 8:35 PM0 commentsViews:

hailstom311 फेब्रुवारी : अवकाळी पाऊस, गारपिटीच्या तडाख्यातून सावरलेल्या बळीराजाला पुन्हा एकदा या अस्मानी संकटात घेरला गेलाय. राज्याच्या अनेक भागला मंगळवारी अवकाळी पावसानं झोडपलंय. जळगाव, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. दुष्काळातून सावरणारा शेतकरी पुन्हा अवकाळी पावसामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्याला अवकाळी पाऊसाचा तडाखा बसला. जिल्ह्यात मंगळवारी वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. काही भागात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं. या पावसाचा केळी, गहू, कपाशी, हरभरा, कांदे, पपईला मोठा फटका बसला आहे.

कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं. कळवण तालुक्यातल्या काही भागात गारपीट झाली.
तर सटाणा, देवळा, आणि मालेगाव तालुक्यात वादळासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे गहू, हरबरा, कांदा, भाजीपाला व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर विदर्भातल्या शेतकर्‍यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय. मंगळवारी रात्री झालेला अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. यात गव्हाच्या पीकाचं सर्वाधिक नुकसान झालंय. वादळी वार्‍यामुळे गहू मोडून प़डलाय. संत्रा पिकाचंही मोठं नुकसान झालंय.

वर्धा जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय. गहु कांदा पिकाचं नुकसान झालंय. तर आंब्याचा मोहरही गळालाय. त्यामुळे आंबा उत्पानात घट होण्याची शक्यता आहे. 3 वर्षांपासून पडणारा दुष्काळ आणि त्यात हा अवकाळी पावसाचा फटका त्यामुळे कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न शेतकर्‍यांना पडलाय. शेतकरी मदतीची मागणी करतायत. येत्या 48 तासांत विदर्भ आणि मराठवाडयात गारपीट आणि पाऊस होण्याची शक्यता खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यानी व्यक्त केलीये. एकूणच पहिलेच दुष्काळात अडकलेल्या शेतकर्‍याला आता अवकाळी पावसाचाही फटका बसतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close