राज्यात तिसर्‍या आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन

September 12, 2009 2:17 PM0 commentsViews: 5

12 सप्टेंबर रिपल्बिकन डाव्या लोकशाही आघाडीनं शनिवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तिसर्‍या आघाडीनं आघाडी घेत सगळ्याच स्टार नेत्यांसह शक्तीप्रदर्शन केलं. या सभेत विनोद कांबळी, संजय दत्त हे स्टार उपस्थित राहिले. नुसतेच उपस्थित राहिले नाही तर त्यांनी आपापल्या शैलीत भाषणंही केली. नवीन खेळाडू तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करु तसंच शिक्षकांच्या हक्कांसाठी गरज पडली तर जेलमध्ये जाण्याची तयारी असल्याचं विनोद कांबळीनं सांगितलं. तर येती विधानसभा निवडणूक आपण विक्रोळी मतदारसंघातून लढणार असल्याचंही विनोद कांबळीनं जाहीर केलं. संजय दत्तने तिसर्‍या आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी सर्वच नेत्यांनी राज्याचं राजकारण बदलणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

close