जानेवारीपासून रोज एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू

February 11, 2015 11:44 PM0 commentsViews:

h 1 n 1 3311 फेब्रुवारी : राज्यभरात H1 N 1 अर्थात स्वाईन फ्लूनं थैमान घातलंय. जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे 41 दिवसांमध्ये 40 जणांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय. म्हणजेच जवळपास रोज एका व्यक्तीचा स्वाईन फ्लूनं मृत्यू होतोय.

सर्वात जास्त बळी हे नागपूर जिल्ह्यात आहेत. नागपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे 16 जण दगावले आहे. तर 239 जणांना स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे.

पुण्यामध्ये 8 आणि त्यापाठोपाठ मुंबईत 5 जणांचा मृत्यू झालाय. आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी आज ठाणे जिल्ह्यातल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

जानेवारीपासूनची आकडेवारी
नागपूर – 16
पुणे – 8
मुंबई – 5
लातूर – 2
औरंगाबाद – 2
अहमदनगर – 2
गोंदिया – 1
जालना – 1
सातारा – 1
नवी मुंबई – 1
पालघर – 1

काय घ्यावी काळजी

  • सर्दी-खोकला झाल्यावर टेस्ट करून घ्या
  • खोकताना आणि शिंकताना रूमालाचा वापर करा
  • गर्दीच्या ठिकानी जाणं टाळा

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close