केजरीवाल यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

February 12, 2015 11:32 AM0 commentsViews:

B9nqaDFCIAA4TFj

दिल्ली (12 फेब्रुवारी) :दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठे यश मिळवल्यानंतर मंगळवारीच मोदींनी केजरीवाल यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळीच त्यांनी केजरीवाल यांना भेटण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यानुसार त्यानुसार आज सकाळी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15-20 मिनिटं दिल्लीतील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया उपस्थित होते. केजरीवाल यांनी येत्या शनिवारी म्हणजेच 14 फेब्रुवारीला होणार्‍या शपथविधी सोहळ्याचा पंतप्रधानांना निमंत्रण दिले. पण, पंतप्रधान 14 तारखेला महाराष्ट्र दौर्‍यावर असल्याने ते उपस्थित राहू शकणार नसल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मनीष सिसोदीया यांनी पंतप्रधान मोदींसोबत चांगली चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. आम्ही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. यावर पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून दिल्लीच्या विकासासाठी पंतप्रधानांनी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असं सिसोदीया यांनी सांगितलं आहे. यापूर्वी काल केजरीवालांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडेही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close