अमेरिकेचा निधी भारतविरोधी कारवायांसाठी – परवेझ मुशर्रफ

September 14, 2009 9:12 AM0 commentsViews: 4

14 सप्टेंबर अमेरिकेने पाकिस्तानला दिलेला मदतनिधी हा भारतविरोधी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्ऱफ यांनी केला आहे. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगीतलं. अमेरिकेकडून मिळणारा निधी हा तालिबान विरोधात वापरला जायचा तसा भारताच्या विरोधातही वापरला जातो. ते योग्य असल्याचं मत मुशर्रफ यांनी व्यक्त केलं. आमची माणसं देशाची सुरक्षा महत्वाची मानतात. यात अमेरिकेची कोणतीही नाराजी नाही असंही ते म्हणाले.

close