दिल्लीतल्या भाजपच्या पराभवावर राज ठाकरेंचं व्यंगचित्र

February 12, 2015 10:01 AM1 commentViews:

raj cartoon

12 फेब्रुवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्ली निवडणूक आणि आपचा ऐतिहासिक विजय यावर व्यंगचित्र रेखाटले आहे. हे व्यंगचित्र मनसे अधिकृतने ट्विट केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला होता. पण यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’कडून भाजपचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून भाजपला चिमटा काढला आहे. राज सध्या फारच क्वचितच व्यंगचित्र काढतात पण हा निकालच एवढा ऐतिहासिक होता की त्यांनी हे व्यंगचित्र काढून त्यावर भाष्य केलं आहे.

राज यांनी व्यंगचित्रात मोदी आणि शहा भाजपच्या ट्विन्स टॉवरसारख्या मोठ्या इमारती दाखवल्या असून केजरीवालांच्या विमानाने दोन्ही इमारतींना भगदाड पाडल्याचं व्यंगचित्र रेखाटले आहे. तर दिल्लीतील हे सगळे दृश्य ओबामा टीव्ही बघत आहेत. ओबामांचा वापर करून दिल्ली निवडणुकांत मोदींनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्यांचा दारूण पराभव असं या व्यंगचित्रात साकारला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • dattatray pawar

    आत्तापर्यंत भाजपनेच मित्रपक्षाला कोंडीत पकडला होता व आहे … हेच खरे आणि सत्य आहे … भाजपाची चलती झाली म्हणून काय काय मित्रांना त्रास देणे शोभते का? …. भाजपचे दिवस आले म्हणून भाजपा ने शिवसेनाला त्रास दिला … कर्माचे भोग दुसरे काय?

close